Test Data

गोकुळ दूध संकलन

गोकुळ डेअरीची स्थापीत क्षमता 7 लाख लिटर्स प्रतिदीन व पाच दूध शीतकरण केन्द्रांची क्षमता 5.25 लाख लिटर्स अशी मिळून संघाची एकूण 12.25 लाख लिटर्स प्रतिदिन प्रस्थापित दैनंदीन दूध हाताळणी क्षमता आहे. संघाने दूध संकलन करणेसाठी एकूण 380 रुट तयार केले असून सदर रुट 5367 गावपातळी वरील दूध संस्थांशी जोडलेले आहेत.

वर्ष 2015-2016 मध्ये, दैनंदीन सरासरी दूध संकलन 9. 81 लाख लिटर इतके आहे. एकूण संकलन होण्या-या दूधापैकी म्हैशीचे दूध ५३% व गाईचे दूध 47% आहे. म्हैस दुधाचे सरासरी फॅट ७. ४% व एस.एन.एफ. ९.५% असून गाय दूधाचे सरासरी फॅट ४.२% व एस.एन.एफ. ८.५% आहे.

सन 15-16 मध्ये म्हैस दुधाचा सरासरी खरेदी दर रु.40.45 आणि गाय दुधाचा सरासरी खरेदी दर रु.26.28 आहे.

 

दूध संकलनात वाढ होणेसाठी प्राथमिक दूध संस्था आणि दूध उत्पादकांना विविध पुरस्कार जाहीर केले जातात तसेच अनेक योजना राबविल्या जातात.

1. दूध पुरवठा व गुणवत्तेसाठी बक्षिसे

दुधाचे उत्पादन व गुणवत्ता वाढविण्यासाठी १९९० पासून गोकुळमार्फत प्राथमिक दूध संस्थाना खालील उपलब्धींसाठी बक्षीसांचे वितरण करणेत आले आहे

  १. संघास जास्तीत जास्त दूध पुरवठा करणा-या दूध संस्था ( म्हैस दूध / गाय दूध )
  २. उत्तम प्रतिचे दूध पुरवठा करणा-या संस्था
  ३. संघास जास्तीतजास्त म्हैस दूध पुरवठा करणा-या संस्था
  ४. संघास जास्तीतजास्त गाय/म्हैस दूध पुरवठा करणारी महिला दूध संस्था

प्रत्येक गटामधून तहसील व जिल्ह्यानुसार पुरस्कारांसाठी तीन नावे निवडली जातात. वर्षपूर्तीच्या वेळेस पुरस्कार प्रदान केले जातात.

2. ‘गोकुळ श्री’ पुरस्कार 

१९९२ साला पासून गोकुळने ‘गोकुळ श्री‘ या पुरस्करची सुरवात केली. यामध्ये एका दिवसामध्ये जास्तीत जास्त दूध देणारी म्हैस व गाय निवडली जाते. ही स्पर्धा जिल्हास्तरीय असून गायींचे आणि म्हशींचे प्रथम तीन क्रमांक निवडले जातात. संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्यावेळी सदर बक्षीसांचे वितरण केले जाते.

3. युवा ‘गोकुळ श्री ‘ पुरस्कार

२०११ ते २०१२ पासून गोकुळने वासरु संगोपन योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या व दूधात आलेल्या वासरांसाठी ‘युवा गोकुळ श्री‘ हा पुरस्कार सुरू केला आहे ही स्पर्धा जिल्हास्तरीय असून गायींचे आणि म्हशींचे प्रथम तीन क्रमांक निवडले जातात. संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्यावेळी सदर बक्षीसांचे वितरण केले जाते.

4. दूध उत्पादकांसाठी प्रॉव्हीडंट फंड योजना 

दूध उत्पादकांना वयाच्या साठाव्या वर्षी आर्थिक आधार मिळणेसाठी प्रॉव्हीडंट फंड ही योजना प्राथमिक दूध संस्थेच्या माध्यमातून सुरू केली आहे. संघाने यापैकी ‘अ’ योजने नुसार दूध उत्पादक प्रति लिटर 15 पैसे, संस्था 10 पैसे व संघ वर्गणी 15 पैसे या प्रमाणे रक्कम जमा केली जाते. ‘ब’ योजनेनुसार दूध उत्पादक प्रति लिटर 10 पैसे व संघ वर्गणी 10 पैसे या प्रमाणे रक्कम जमा केली जात आहे.


5. ‘किसान’ विमा पॅकेज योजना

दूध उत्पादकांवर अचानक ओढवणारी आपत्ती व त्या मुळे होणारे आर्थिक नुकसान किंवा उत्पादकांचा मृत्यू या प्रसंगी त्याला आर्थिक मदत मिळावी या हेतुने संघाने दूध उत्पादकांसाठी विमा योजना सुरू केली. विमा धारकांना कमीतकमी विमा हप्त्यामध्ये जास्तीत जास्त लाभ मिळवा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेमध्ये दूध उत्पादकांना त्यांचे राहते घर, घरातील वस्तु, शेती उत्पादने, बायो–गॅस, दोन दुभती जनावरे, बैल जोडी, विद्युत मोटर इत्यादीं साठी तसेच आग, भुकंप, वादळ, पूर या पासून होणा-या हानी पासून विमा संरक्षण दिले गेले आहे त्याच प्रमाणे उत्पादक दाम्पत्यास अपघातामुळे मृत्यु, कायमचे अपंगत्व, दवाखाना दाखल खर्च या साठी विमा संरक्षण दिले जाते.

 

Test Data