Test Data

वासरू संगोपन

उद्देश आणि वैशिष्ट्ये

 • शेतकर्यांशच्या घराजवळ सुधारित मादी वासरू संगोपन केंद्रे उभी केली आहेत.
 • वासरांचा पहिल्या तीन महिन्याचं खर्च कमी करण्यासाठी ‘मिल्क रिप्लेसर’ आणि ‘काफ स्टार्टर’ च वापर केला जातो.
 • वासराचे वय आणि त्याचे उत्पादकता जीवन सुधारण्यासाठी संघातील डॉक्टर्स कडून त्यांच्या आरोग्याचे निरीक्षण केले जाते.
 • तरुण मादी वासरे घेऊन येऊन अधिकाधिक प्रमाणात दूध निर्माण करणे यासाठी प्रवृत्त केले जाते व त्यांना अनुदानाच्या माध्यमातून लाभांश प्राप्त करून दिला जातो.

कार्यक्रमाची विशेषता

 • पेडिगरीद नोंदनिकृत जर मादी वासरू त्याच्या वयाच्या २२ महिन्याच्या आत गर्भधारणा झाली तर रुपये ३००० आणि २३ ते ३० महिन्यामध्ये रुपये २००० व दुयर्यांणदा गर्भधारणा झाल्यास रुपये १००० इतके अनुदान मिळते. तसेच म्हशीचे वय ४० महीने असल्यास रुपये ५००० आणि म्हशीचे वय ४१ ते ४८ दरम्यान असलेस रुपये ३००० व दुयर्यांरदा गर्भधारणा झाल्यास रुपये २००० इतके
 • अनुदान दिले जाते. जर गायीची गर्भधारणा खात्री १८ महिन्यात व म्हशीची ३६ महिन्यात झालेस प्रेरनामूल्य म्हणून रुपये ५०० दिले जातात.
 • ऑक्टोबर २००५ पासून ते मार्च २०१२ पर्यन्त शेतकर्यांयनी एकूण १,६१,६६३ मादी वासरांची नोंद केलेली आहे.
 • प्रारंभिक तीन महिन्यांचा खाद्य खर्च कमी करण्यासाठी गोकुळ दूध यूनियन तर्फे ‘महालक्ष्मी मिल्क रिप्लेसर’ आणि ‘काफ स्टार्टर’ योजना विकसित केल्या आहेत. या योजनेमुळे ५५ ते ६० % खाद्य खर्च कमी होतो.
 • ‘महालक्ष्मी मिल्क रिप्लेसर’ आणि ‘काफ स्टार्टर’ यांच्या स्वादिष्ट , पचनाला सोपे व उत्तम पोषण मूल्य यामुळे वासरांच्या वजनांमध्ये लाक्षणिक वाढ दिसून आली आहे.
 • गायींच्या वासरांमध्ये ५ % आणि म्हशींच्या रेडकांमध्ये १५ % अनुक्रमे मृत्युदरात घट झाली आहे.
 • शेतकर्यां च्या घराजवळ ‘वासरू संगोपन कार्यक्रम’ याची अमलबजावणी केल्यामुळे सुधारित व संकरीत वासरे भविष्यात कायम स्वरूपी दूध उत्पादनात वाढ होईल असे अपेक्षित आहे.

उद्देश आणि वैशिष्ट्ये

‘मिल्क रिप्लेसर’ बद्दल ‘एकस्वीकृत’ या पुरस्काराने गोकुळ दूध संघाला भारत सरकार कडून सन्मानित केले.

वासरू संगोपन योजना बुकलेट

 

 

 

Test Data