Test Data

कृत्रिम रेतन सेवा

जनावरांचे गोठ्यात जातीवंत जनावरांची पैदास होणेसाठी कृत्रिम रेतन सेवा आवश्यक आहे. उच्च अनुवंशिक जनावरांच्या वीर्यमात्रा वापरुन तयार झालेल्या जनावरांमुळे दूध उत्पादनात वाढ होत आहे.

२०१५-२०१६ मध्ये कृत्रिम गर्भधारनेच्या विस्तारित सेवा पुढील प्रमाणे -

 

फिरती कृत्रिम गर्भधारणा केंद्रे

४३०

कृत्रिम गर्भधारनेच्या केसेस

२,९०,४२२

गाभण केसेस

,१९,४४६

कृत्रिम गर्भधारणेमुळे जन्मलेली वासरे

८८,९१३

 

सस्टेनेबल अपग्रेडेड मादि वासरु संगोपन योजना :

कृत्रिम गर्भधारना सेवे अंतर्गत  प्रतिवर्षी ३५,००० ते ४०,०००  रेडके आणि वासरे जन्माला येतात. तथापि जन्माला आलेली रेडके/वासरे व दूध उत्पादना यांचे आकडे एकमेकांशी सुसंगत नाहीत. याचे कारण तपासले असता आम्ही अशा निकषास आलो की शेतकरी या नवजात जनावरांची योग्य काळजी घे नाहीत.  नवजात रेडकू/वासरू  यांना पहिले तिन महीने दररोज किमान दोन/तीन लि. दूध द्यावे लागते. या दुधाचे मूल्य ६५ ते ९५ रुपये इतके आहे.  त्यामुळे स्वाभाविकपणे शेतकरी दूध विक्रीच्या मिळकतीतून त्याच्या दैनंदीन गरजा भागवतात.  रेडके/वासराना पोषण दूध मिळत नसलेने त्यांची वाढ होत नाही. तसेच पुढे त्यांच्या दूध देण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.
पर्यायाने या सर्वाचा परिणाम वासरांच्या वाढीवर, दूधात येण्यावर व उत्पादकते वर होऊ लागला आहे. या सर्वाचा विचार करुन गोकुळने ऑक्टोंबर २००५ पासून जातिवंत मादि वासरु संगोपन योजना सुरु केली आहे.

 

 

 

Test Data