Test Data

दूध उत्पादक आणि दुग्ध सहकारी प्रशिक्षण. संस्था

आनंदराव डी. पाटील (चुयेकर) दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धन प्रशिक्षण केंद्र, ताराबाई पार्क, कोल्हापूर.

‘ऑपरेशन फ्लड प्रोग्राम’ अंतर्गत राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या दूध महापूर योजनेतून प्रशिक्षण केंद्राची स्थापना झाली. सन 1984 पासून प्रशिक्षण केंद्र कार्यांवीत करणेत आले. सदर प्रशिक्षण केंद्राचा उद्देश दूग्धव्यवसायाशी संबंधीत सर्व घटकांना प्रशिक्षण देणे हा आहे. दूध महापूर योजणेमध्ये प्रशिक्षणातून मानवी विकास, विस्तार सेवा व संस्था बांधणी उपक्रमांना देणे आहे. प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून ‘ऑपरेशन फ्लड प्रोग्राम’ या बाबतचे सर्व माहिती दिली जाते.
 

 
 


एकत्र दूग्ध व्यवसायातील प्रगत तंत्रज्ञानाची माहीती ग्रामीण भागातील दूध उत्पादक, संस्थेचे संचालक, पंचकमीटी सदस्य, संस्थेचे कर्मचारी यांना व्हावी ज्यामुळे सामाजिक व आर्थिक सुधारणा घडून याव्यात यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे.

उद्दिष्टे

  • दूध संस्था कर्मचारी आणि दूध उत्पादक यांच्या दूधव्यवसायाशी संबंधीत ज्ञानात वाढ करते.
  • कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रा मध्ये दूध सहकारी संस्थांचा प्रभाव निरंतर ठेवणे.
  • दूध उत्पादकांच्या दूध उत्पादनामध्ये वाढ करणे व स्वच्छ दूध उत्पादनासाठी प्रोत्साहन देते.
  • कृत्रिम रेतन करणेचे तंत्र, दूध चिकीत्सा, दूध संकलन इत्यादी बाबतचे प्रशिक्षणाचे प्रत्यक्ष फिल्ड वर नियोजन करुन संबंधीत संस्था व व्यक्तिचे ज्ञान, कौशल्य वाढविणे.
  • दूग्ध व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबत्व व व्यक्तीविकास साधणे.
     
  • li>शैक्षणिक सहलीच्या नियोजनातून प्रत्यक्ष विस्तार कार्यक्रम बाबतची उदाहरणे दाखविणे. त्याद्वारे विश्वास दृढ करुन तो निरंतर ठेवणे.
     

प्रशिक्षण केंद्रातील उपलब्ध सेवा व सुविधा


>> २ वर्ग - प्रत्येकी 30 विद्यार्थी
>> वसतिगृह
>> भोजन गृह / खानावळ
>>प्रयोगशाळा
>> संगणक कक्ष
>> 30 प्रशिक्षणार्थ्यांची सोय असलेले वाचनालय अभ्यासिका
>> दृक-श्राव्य माध्यमे जसे की लॅपटॉप, एलसीडी प्रोजेक्टर
>>१५० प्रशिक्षणार्थ्यांसाठीचा कॉन्फरन्स हॉल

उत्तम गुणवत्ता आणि व्यवस्थापनामुळे या प्रशिक्षण केंद्राला १९८६ पासून प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र म्हणून एन.डी.डी.बी. ची मान्यता मिळाली आहे.

गोकुळच्या प्रशिक्षण उपक्रमाचा राज्यातील सर्व दूध सहकारी संघ संस्थांचे पदाधीकारी, पंचकमीटी सदस्य, दूध उत्पादक यांना खुप लाभ झाला आहे.

 संघाचे प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणा बद्दलची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे

१) खाते व्यवस्थापन आणि सचिव कार्य प्रशिक्षण

( ६ दिवसांसाठी )

हे प्रशिक्षण दूध संस्थांच्या सचिवांसाठी आहे. या अभ्यासक्रमात संस्थेच्या आर्थिकव्यवहारा संबंधीत पावत्या तयार करणे, व्हौचर्स तयार करणे, दैनंदीन खाते व्यवस्थापन करणे, व्यवहारानुसार रजिस्टर तयार करणे, ट्रायल बॅलन्स, नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक, व्यापार पत्रक, दूध डेअरी व्यवसाय माहिती, फिल्ड वर्क व दूध संकलन इत्यादीचे शिक्षण दिले जाते.

फायदे :
सचिवांचा आत्मविश्वास वाढलेमुळे स्वत: ताळेबंद तयार करणे, संस्थेमधील नफा-तोटा कारणे शोधून काढणे इ. प्रकारची कामे ते करू शकतात, त्यामुळे आपोआपच नफा मिळवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरु होते. त्यासाठी ते शास्त्रिय अशा पध्दतीचा वापर करू लागतात.

 

२) सचिवांसाठी व्यवस्थापन प्रशिक्षण

( ६ दिवसांसाठी )

सहकार तत्त्वे, व्यवस्थापन तत्त्वे, कायद्याची ओळख, आणंद पॅटर्न, मासिक व वार्षिक सभा, प्रोसीडींग लेखन, आदर्श सोसायटी बाबतच्या सचिवांच्या जबाबदा-या, दूध आणि दुधामधील घटक, स्वच्छ दूध उत्पादन, जनावरांची देखभाल, दूध संकलना मधील अडचणी व त्यावरील उपाय, पशुखाद्य प्रक्रिया, पशुखाद्याची व वैरण उत्पादनाची माहीती, सोसायटीच्या रेकॉर्डची माहीती, मिल्कों टेस्टरचे कार्य, ऑडिट व संबंधीत नियम, दूध संस्थांना भेटी इत्यादी.

फायदे :
सचिव संस्थेच्या अकौंटिंगचे काम, प्रोसिडींग लिखाणाचे काम व नियोजनाचे काम स्वत: करतात. तसेच दूध उत्पादक व पंच कमीटी यांचेशी सुसंवाद प्रस्थापित करुन दूध संस्थेची स्थिती सुधारली जाते.

 

३)सचिवांना अकौंटिंग व व्यवस्थापन प्रशिक्षण

( १५ दिवसांसाठी )

सदर प्रशिक्षण संस्थेचे सचिव आणि दूध संकलन पर्यवक्षकांसाठी उपयुक्त आहे.
सर्व अभ्यासक्रम वरील क्रमांक १) व २) प्रमाणे.
अभ्यासक्रमाचा उद्देश म्हणजे नवीन तंत्रज्ञान वापरून कमी खर्चामध्ये सर्व सेवा आणि सुविधा उपलब्ध करणे आहे तसेच दूग्ध उत्पादकता जास्तीत जास्त वाढीस नेणे.

 

४) दूध गुण तपासणी प्रशिक्षण

( २ दिवसांसाठी )

शास्त्रशुध्द पध्दतीने दूध उत्पादकांच्या दूधाची तपासणी करणे

सहकाराची तत्वे, आणंद कार्यप्रणाली, दूध आणि दुधाचे घटक, शुद्ध / स्वच्छ दूध उत्पादन, दूध तपासणी प्रक्रियांची माहिती, रसायनाची माहीती प्रात्यक्षिक संस्था भेटीतून स्वत: चे आत्मनिरीक्षण व इतरांशी संबंध ठेवणे, याचा अभ्यास करणे

फायदे :
दूध संस्थेकडे संकलीत होण्या-या दूधाची गुणवत्ता वाढवणे गरजेचे आहे करणे अत्यावश्यक आहे.

 

५) दूध संकलनाचे प्रशिक्षण (दूध संकलन / मोजणी प्रणाली)

( २ दिवसांसाठी )

आणंद कार्यप्रणाली पध्दतीने स्वच्छ दूधाचे कायद्याने मान्य असलेल्या उपकरणांच्या साह्याने संकलन करणे व दूध उत्पादकांशी सुसंवाद साधने, आत्मपरिक्षण, परस्परसंबंध, सहकार, प्रत्यक्ष फिल्डवरती भेटी देणे व स्वत: अभ्यास करुन सुधारित संकलन पध्दतीसाठी माहिती गोळा करणे.

फायदे :
दूध संस्था पातळीवर संकलनामध्ये अचूकता येते व दूध उत्पादकांचा विश्वास वृध्दींगत होतो.

 

६) दूध उत्पादक शेतक-यांचे प्रशिक्षण

( 3 दिवसांसाठी )

दुग्धव्यवसायाकडे आर्थिकदृष्ट्या एक फायदेशीर व्यवसाय म्हणून पाहणे, दूग्ध व्यवसाय त्रिस्तरिय सहकारी व्यवसाय उदा. 1.आणन्द पॅटर्न 2. स्वच्छ दूध उत्पादन व 3. निरोगी गुरांची निवड, जनावरांचे रोग, प्रथमोपचार, कृत्रिम रेतन, संतुलित पशुखाद्य, शेतक-यांशी संवाद, दूध संस्थांना भेट, 'गोकुळ प्रकल्प' भेट, व्यक्तिमत्व विकास,.

फायदे :
किफायतशीर दूध उत्पादन व जनावरांचे उत्तम व्यवस्थापन करणे.

 

७)व्यवस्थापन समिती सदस्य प्रशिक्षण (एम.सी.एम.ट्रेनिंग)

( 3 दिवसांसाठी )

सहकारी संस्थां व्यवस्थापन कायदा, सहकारी संस्था तत्त्वे , आणंद पॅटर्न, संचालक मंडळ सभा प्रक्रिया, सभेचे महत्व, सभे मध्ये सहभाग, वैरण लागवड, जनावरांचे खाद्य प्रकार, दूध कमी होण्याची कारणे व त्यावरिल उपाय, स्वच्छ दूध उत्पादन, पशुसंवर्धन, दूध संस्थांना भेट, सेवा आणि सुविधा विषयी माहिती करुन घेणेसाठी 'गोकुळ दूध प्रकल्प' भेट.

फायदे :
दूध संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, रेकॉर्ड तपासणे, नफा वाढविणे, तोट्यांची कारणे शोधणे, प्रशासन नियंत्रित करणे, ऑडिट दुरुस्ती करणे.

 

८) कृत्रिम रेतन आणि प्रथमोपचार प्रशिक्षण

( ५० दिवसांसाठी )


अ) कृत्रिम रेतन
कृत्रिम रेतनाचे महत्व, फायदे व तोटे, कृत्रिम रेतन पध्दती, कत्तलखान्यातून जनावरांचे प्रजनन अवयव यांची माहीती घेणे. कृत्रिम रेतन साहित्याचा वापर करुन कृत्रिम रेतन करण्याचा सराव, कंटेनर हाताळणी, गर्भधारणा निदान व त्याच्या पद्धती, वांझपणा याची कारणे व प्रतिबन्धात्मक उपाय, गर्भधारणेचा दर सुधारण्यासाठी काय करावे, रेकॉर्ड किपींग इत्यादी.,

ब) पशुसंवर्धन
पाळीव गाई आणि म्हैशींच्या जाती व प्रकार, गाय आणि म्हैशींचे व्यवस्थापन (प्रजनन, खाद्य, पिण्याचे पाणी, गोठा व्यवस्थापन). हिरव्या चा-याचे महत्व, हिरवा चारा आणि त्याची लागवडी बाबतचे वेळापत्रक, वासरू संगोपन पध्दती व महत्त्व, दूध उत्पादकांच्या संभाषण कौशल्य, मनोवृत्ती, वागणूक, व्यक्तीमत्व इत्यादि बाबतीत सुधारणा घडवून आणणे.

क) प्रथमोपचार
निरोगी आणि आजारी जनावरांची लक्षणे ओळखणे, वैद्यकीय चिकित्सा पद्धती, सामान्यपणे वापरली जाणारी प्रथमोपचार औषधे, सर्वसामान्यपणे उदभवणारे रोग व त्यावरिल प्रथमोपचार, सर्वसामान्य संसर्गजन्य रोग आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय, लसीकरणाचे महत्व व लसीकरणाचे वेळी घ्यावयाची खबरदारी.

फायदे :
स्वत:च्या गोठयामध्ये जास्तीतजास्त सुदृढ जनावरांची पैदास कशी करावी, जास्तीजास्त प्रमाणात दूध उत्पादन कसे घ्यावे. कमीकमी खर्चात जनावरे कशी वाढवावीत, बचतीचे व काटकसरीचे व्यवस्थापन करुन दूध उत्पादन कसे वाढवावे या सर्व बाबी प्रशिक्षणार्थ्यांना शिकवल्या जातात.

 

९) कृत्रिम रेतन व प्रथमोपचार उजळणी प्रशिक्षण

( ६ दिवस )

सर्व अभ्यासक्रम वरील नंबर ८ प्रमाणे. (कृत्रिम रेतन स्किल मध्ये सुधारणा)

प्रशिक्षण शुल्क
प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिदिन रु. २०० प्रशिक्षण शुल्क आहे. (जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांना रु.१५०/- प्रमाणे गोकुळ कडून २५% अनुदान दिले जाते). यामध्ये राहणे, जेवण, स्टेशनरी साहित्य, प्रशिक्षण फी, फिल्ड व्हीजीट इत्यादीचा समावेश आहे

वरील प्रशिक्षण कार्यक्रम व्यतीरिक्त, इतर जिल्हा सहकारी संघ, राज्य सरकार, एन.जी.ओ., जिल्हा परिषद, इतर सहकारी संस्थां यांचे मागणी व आवश्यकतेनुसार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात.

 

हिरवा चा-याची पिके

बियाणे आणि गुणवत्ता माती जमीन पेरणी साठीचा हंगाम अंतर प्रती एकर बियाणे पिक पध्दत उत्पादन क्विंटल प्रति हेक्टर
मका
-उंच आफ्रिकन
हलके,
मध्यम,
ड्रेनिंग
खरीप, रब्बी व २५ २० किलो एकदा ४०० ते ४५० क्विंटल
आफ्रिकन टॉल
सोरगम
मध्यम,ड्रेनिंग
उन्हाळी सेमी     क्विंटल
ज्वारी- सुदान
सोरघाम
जड, मध्यम,
निचरा होणारी
खरीप, रब्बी व उन्हाळी २३ ते ३० सेमी १० किलो तीन ते चार ४५० ते ५०० क्विंटल
बाजरी- मालदांडी शाळू हलकी, मध्यम खरीप, रब्बी व उन्हाळी २३ ते ३० सेमी १० किलो दोन ते तीन ४०० ते ४५० क्विंटल
लसूण गवत ए:२ , टी:९ मध्यम ते जड, वेल-ड्रेनिंग रब्बी ऑक्टो. ते डिसे. ३९ सेमी ८ कि.ग्रा. सात ते आठ ८०० क्विंटल
यशवंत गवत जड, मध्यम खरीप , उन्हाळी ९० सेमी १०,००० सेट्स आठ ते दहा २००० क्विंटल
एन.बी. २१ मार्व्हल मध्यम, जड खरीप , उन्हाळी ३० सेमी २५,००० सेट्स दहा ते बारा २५००० क्विंटल

कृती / पध्दत:
 

१. जास्त प्रमाणात वाढणारे पीक निवडा.
२. उत्तम व दर्जेदार बियाणे वापरा.
३. नापीक जमीन विकसित करुन त्यावर गवत पीक घ्या.
४. दोन पिकांच्या दरम्यान कमी वेळात वाढणारे गवत पीक घ्या.
५. घरा जवळ ज्या ठिकाणी कच-याचा निचरा होतो अशा ठिकाणी गवत वाढवा.
६. राखीव जागेत फळझाडे लाऊन त्यांच्या सावली मध्ये गवत पीक घ्या.
७. बांबूची झाडे वगळता सामुदायीक जमीनीवर जास्त वर्षे जगणारी झाडे किंवा गवत पीक घ्या.

युरिया प्रक्रिया :

कमी पोष्टीक चारा, साधा चारा, डोंगरी गवत इत्यादे वर यूरिया प्रक्रिया करून त्यांचे पौष्टिक चा-या मध्ये रूपांतर केले जाऊ शकते.

फायदे :
 

१. चारा चवदार होतो.
२. चा-याचे पोषणमुल्य वाढणेस होतो.
३. चारा पचनास हलका होतो.
४. जनावरांना नियमित चारा दिल्याने दूधाचे उत्पादन व फॅटचे प्रमाण वाढते.

युरिया प्रक्रिया पध्दती :

४० लिटर पाणी आणि ४ किलो युरिया याचे मिश्रण तयार करा. १०० किलो चा-यावर हे मिश्रण एकसारखे शिंपडा. भरपूर दाब देवून प्लास्टिक पेपरमध्ये घट्ट गुंडाळून ठेवा. गवतावरील युरियाची प्रक्रिया २१ दिवसांनी पूर्ण होते. नंतर, आवश्यकतेनुसार जनावरांना प्रक्रिया केलेला पौष्टिक चारा खायला द्या.

सन 2016-2017 साठीचे प्रशिक्षण श्येड्यूल

Test Data