Test Data

सामुदायिक जंत-निर्मुलन व लसीकरण

संघामार्फत सामुदायिक जंत-निर्मुलनाचा कार्यक्रम वर्षातून दोनवेळा राबविला जातो. यामुळे जनावरांची प्रतिकार शक्ती, दूध उत्पादकता आणि आरोग्य सुधारते. दूध संस्थांच्या माध्यमातून दूध उत्पादकांना जंत निर्मुलनांची औषधे अनुदानीत दरात पुरविली जातात. जनावरांना तोंडाचे, लाळखुरकत आणि घटसर्प, करचा यासारखे आजार होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत जनावरांचे वर्षातून दोनवेळा लसीकरण केले जाते.

 

आहार संतुलन कार्यक्रम (आर.बी.पी.)

 

गोकुळ दूध संघाकडून मार्च 2013 पासून नॅशनल डेअरी प्लॅन-1 अंतर्गत 200 खेडी व 20000 जनावरांची निवड करुन आहार संतुलन कार्यक्रम राबवणेत येत आहे. शेतक-यांकडील उपलब्ध वैरणीमध्ये पौष्टीकतेच्या आवश्यकतेनुसार बदल करुन ते संतुलित केले जाते. तसे करणेसाठी एन.डी.डी.बी. ने विकसीत केलेले इनफ या सॉफ्टवेअर प्रणालीचा वापर केला जातो.
मार्च 2015 अखेरच्या मॉडेल-1 अंतर्गत 240 खेडी व 21394 जनावरे तसेच मॉडेल-2 अंतर्गत 98 खेडी व 1691 जनावरे स्थानिक संसाधन प्रतिनीधी (LRP) द्वारे सदर कार्यक्रमामध्ये समाविष्ट केली गेली आहेत. सदर योजनेमुळे दूधाच्या गुणवत्तेत व उत्पादनात वाढ होणे, दूध उत्पादन खर्चामध्ये बचत होणे, जनावरांच्या आरोग्यात सुधारणा होणे, जनावरांचे पचनक्रीया व वन्धत्वा बाबतच्या समस्या दूर होणे असे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. तसेच उत्पादक पातळीवर जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा घडून आली आहे. एकंदरित, आहार संतुलन कार्यक्रम दूध उत्पादाकासाठी आर्थिकदृष्टीने फायदेशीर ठरलेला आहे.

 

 

Test Data