Test Data

वंध्यत्व शिबीर

किफायतशीर दूग्ध व्यवसायासाठी दोन वेतातील अंतर हा महत्वाचा घटक आहे. संघाच्या कार्यक्षेत्रा मधील जनावरांमध्ये अन्नातून येणारे पौष्टीक घटक, उपलब्ध चारा, वैरण याचा सखोल अभ्यास गोकुळने केला. त्यानुसार वारंवार प्रजनन, अॅनॉस्ट्र्स या सारख्या समस्या निर्माण होत असलेचे आढळून आले आहे. या समस्या सोडविणेसाठी संघाने जून 2013 पासून अशा जनावरांसाठी खास वन्ध्यत्व शिबीरे भरविण्यास सुरवात केली. संघाचे पशुवैद्य तसेच अधिकारी प्रत्यक्ष दूध संस्थेस भेट देऊन जनावरांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करतात हे या शिबीराचे खास वैशिष्ठ्य आहे. तसेच जनावरांच्या आहारावर व त्याच्या पौष्टीकतेवर लक्ष्य केन्द्रीत करुन त्यानुसार शेतक-यांना सल्ला दिला जातो. मिनरल मिक्चरचा वापर, संतुलित आहार, वैरण या बाबतची जागरुकता निर्माण होणेसाठी विविध कार्यक्रमांचे गोकुळमार्फत आयोजन केले जाते. आजअखेर अशा प्रकारच्या कॅम्प व कार्यक्रमांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून मिनरल मिक्चरचा वापरसुध्दा परिणामकारक होत असलेचे निदर्शनास आले आहे. हा कार्यक्रम पशुसंवर्धनाचाच एक अविभाज्य घटक बनला आहे.

 

   
   
Test Data