Test Data

चारा विकसन

गोकुळ दूध संघ केवळ जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विस्तार सेवा देत नाही, तर दूध उत्पादनासाठी चाऱ्याच्या विकासाकरिताही विस्तार सेवा पुरवते.

जनावरांची उत्पादनक्षमता वाढण्यासाठी, पौष्टिक चारा आवश्यक असतो आणि त्यासाठी गोकुळ हंगामानुसार सुधारित केलेली चाऱ्याची बियाणे पुरवतो आणि लागवडीची शक्यता लक्षात घेऊन, संघाने काही विशिष्ट चाऱ्यांच्या बियाण्यांवर १००% अनुदान देण्याचे ठरविले आहे. शिवाय भाताचे गवत आणि गव्हाचे गवत अशा उपलब्ध असलेल्या अपारंपरिक चाऱ्याची पुरवठाक्षमता व पौष्टिक मूल्य वाढविण्यासाठी, आमच्या देखरेखीखाली यूरीया प्रक्रिया चालू आहे. याच्या जोडीला सुधारित मल्टिकट गवताच्या जाती उदा. सीओ३, मार्वल आणि मल्टिकट ल्यूसर्न (विदेशी गवत) बियाणेही दूध उत्पादकांना पुरवण्यात येत आहेत. ऊसासह आंतरपिक म्हणून ल्यूसर्नची शिफारस करण्यात आली आहे.

लागवड केलेल्या चाऱ्याचा वापर करण्यासाठी तसेच चाऱ्याची हानी टाळण्यासाठी गोकुळ दूध संघ देशी चारा कटाई यंत्र आणि भुसा कटाई यंत्र पुरवतो. दर्जेदार चाऱ्याच्या साठवणुकीकरिता गोकुळ दूध संघ सिलोपीट/सिलेजचाही प्रसार करतो.


वर्ष २०११-१२ मध्ये खालील चारा विकास सेवा पुरविण्यात आल्या :

चारा बियाण्याची लागवड १,६९,२९८ कि.
सुधारित मल्टिकट गवत संचाची लागवड ८,९७,१५० संच
देशी चारा कटाई यंत्र पुरविले ३,३३५ नग
शेतकऱ्यांना भुसा कटाई यंत्र पुरवले ८५५ नग
   
 
 
Test Data